Abhiwachan
अभिवाचन म्हणजे काय?
तर कविता, कथा, नाटक किंवा ललित साहित्य हे वाचनातून सपरिणाम श्रोत्यांपर्यंत
पाहोचवणे.अभिवाचन हा शब्द अभिनय आणि वाचन या दोन शब्दांपासून बनला आहे. एखादी कथा, कविता वाचून
दाखवताना त्याला वाचिक अभिनयाची जोड दिली जाते. आवाजातील उतार चढाव या वाचनाला अधिक
परिणामकारक बनवतात..
आपली मुले मराठी पुस्तके तितकीशी आवडीने किंवा समजून वाचत नाहीत. या मुलांना मराठी कथा, कविता
अभिवाचनासारख्या परिणामकारक माध्यमाचा उपयोग करून वाचून दाखवल्या तर?? त्यांना नक्की मराठी पुस्तके
आवडायला लागतील, वाचवीशी वाटतील ....या विचारातून आपण काही अभिवाचनाच्या कार्यक्रमांचे आयोजन केले.
आत्तापर्यंत तोत्तोचान या पुस्तकाचे, काही गूढकथा, लहान मुलांच्या गोष्टी, गाणी, कविता यांच्या अभिवाचनाच्या
कार्यक्रमांचे आपण आयोजन केले. भविष्यातही अशाच सुंदर कार्यक्रमांचे आयोजन करण्याचे प्रयोजन आहे.